२.दमडी मशीद:-
दगडावर केलेले अप्रतिम कोरीव काम साठी ही मशीद प्रासिध्द आहे. ही मशीद भुईकोट किल्ल्यापासून बुऱ्हानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. आशिया खंडातील १० आदर्श मशिदीमध्ये हिची तुलना होते.निजामशाही मधला सरदार सहेल खान याने इसवी सन १५६७ मध्ये ही मशीद बांधली. दमडी हे तेव्हाचे नाण्याचे नाव होते.
तिच्या बांधकामाच्य वेळी तिथे एक फकीर बसत असे.
मजुरांनी दिलेल्या दमड्या साठवून त्याने ही मशीद बांधल्याचे सांगितले
जाते.मिनारांवर तसेच दर्शनी भागात कमळाची फुले कोरण्यात आली आहेत. समोरच्या
भिंतीमध्ये कुराणातील वाचणे कोरण्यात आली आहेत. मशिदीतील संगमरवरी दगडावर ‘अल्ला
आम्हाला विजय मिळवून द्या’ असे कोरण्यात आले आहे. या मशिदीच्या परीअरात एक
बाराव असून त्यात एक थडगे आहे. तसेच अनेक कबरी आहेत.
No comments:
Post a Comment