९. स्नेहालय :-
उपेक्षितांचा आधारवड म्हणून स्नेहालय ओळखले जाते. सामाजिक परिवर्तन आणि अंत्योदयचा स्नेहालय हा एक अभिनव प्रयोग आहे. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या महिला, वेश्या, देवदासी, अनि त्यांच्या निराधार उपेक्षित संततीच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे काम ही संस्था सन १९८९ पासून पाहते. नगर-मनमाड रस्त्यावरील नागपूर ओद्योगिक वसाहतीत स्नेहालय चा पुनर्वसन प्रकल्प आहे. तेथे वेश्यांच्या मुलं-मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे, प्रकल्पाची इमारत घुमटाकृती आहे. एड्स चा वाढता प्रसार लक्षात घेऊन अशा एड्सग्रस्त साठी आधार वसाहत व उपचार केंद्र स्थापन केले आहे.
स्नेहालय तर्फे नगरच्या वेश्यावस्तीत संस्कार
केंद्र चालवले जाते. अनौपचारिक व्यावसायिक शिक्षण, रात्रघर, आरोग्य
प्रकल्प फसवल्या गेलेल्या महिलांसाठी स्नेहाधार, अडचणीतल्या
मुलं-मुलींसाठी चाईल्ड लाईन असे संस्थेचे विविध उपक्रम आहेत. वेश्याव्यवसायात
नव्याने मुली येऊ नयेत म्हणून स्नेहालय ने मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. बस
स्थानकापासून अंतर १२ किमी आहे.
No comments:
Post a Comment