७.तळ्यातला महाल ( फैजबक्ष महाल ):-
हश्त - बेहश्त बागेतील एका छोट्या तालावाच्यामाध्याभागी असलेली ‘फैजबक्ष महाल’ ही अष्टकोनी दुमजली वस्तू सन १५०६ मध्ये अहमद निजामशाह च्या काळात बांधण्यात आली.या वास्तूचे आठ दरवाजे म्हणजे ‘स्वर्गाचे आठ द्वार’ असे म्हणाले जाते. पूर्वी या महालामध्ये जाण्यासाठी होडीचा वापर कराव लागत असे.या वस्तूच्या दक्षिणेकडे हमामखाना आहे. हमामखाना म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह . परंतु हे फक्त बादशाह च्या परिवारातील लोकांसाठीच वापरले जात. पिंपळगाव व शेंदीच्या तलावातून येथे खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते. येथील खेळती हवा व प्रकाश व्यवस्था पाहण्याजोगी आहे. पूर्वी येथे गुलाबाचे सुंदर उद्यान होते. अकबर पुत्र मुरड नगरवर स्वारी करण्यासाठी आला तेव्हा येथे मुक्कामाला होता. महालाजवळ लक्कड महाल ही वस्तू आहे. मुर्तझा दिवाना येथे अज्ञातवासात राहत होता. काही अंतरावर हवा महाल आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे हवा कुठल्याही बाजूने आली तरी मनोऱ्यावर असलेल्या झरोक्यातून प्रवाह आत येतो.
No comments:
Post a Comment